Maval/ Shirur: सखी मतदान केंद्रावर राहणार महिलाराज

मावळ सहा आणि शिरुरमध्ये सहा एकूण 12 सखी मतदान केंद्रे असणार

एमपीसी न्यूज – महिलांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात सहा असे 12 ‘सखी’ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. विधानसभा मतदारसंघात प्रत्येक एक ‘सखी’ मतदान केंद्र असणार आहे. या केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी महिला असणार आहेत.
निवडणूक आयोगातर्फे मतदान प्रक्रियेत महिलांनी सहभागी होत मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात ज्या मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी ‘सखी’ बूथ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात एक ‘सखी’ बूथ तयार करण्यात आला आहे. या केंद्रांवर महिला अधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
  •  …..मावळ मतदारसंघातील हे आहेत सहा ‘सखी’ मतदान केंद्र
# पिंपरी येथील महापालिकेच्या विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालयाच्या तळमजल्यावरील खोली क्रमांक तीन मधील मतदान केंद्र क्रमांक 304
# चिंचवड मतदारसंघात थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण महापालिका शाळा क्रमांक 60/1, पहिला मजल्यावरील खोली क्रमांक एक मधील मतदान केंद्र क्रमांक 178
# मावळ मतदारसंघात कान्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोली क्रमांक एक मधील मतदान केंद्र क्रमांक 117
# कर्जत येथील आर. झेड. पी. प्राथमिक मराठी कन्या शाळेतील खोली क्रमांक एक मधील मतदान केंद्र क्रमांक 166

# पनवेल येथील विखे पाटील शाळेतील मतदान केंद्र क्रमांक 344 तर  उरण मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 229
  • …शिरुर लोकसभा मतदारसंघातील हे आहेत सहा ‘सखी’ मतदान केंद्र
# जुन्नर येथील एन.पी. शाळा क्रमांक 1 जुनी बिल्डींग पश्चिमेकडील खोली क्रमांक 3
# आंबेगावमधील 89 न्यू इंग्लिश स्कूल जनता विद्या मंदिर, घोडेगांव
# खेड-आळंदी येथील 140 हुतात्मा राजगुरु  विद्यालय राजगुरुनगर पश्चिमेकडील खोली क्रमांक 3
# शिरुरमधील 17 विद्याधाम प्रशाला शिरुर अर्बन पश्चिमेकडील खोली क्रमांक 4
# भोसरीतील 156 माता अमृतानंदमयी विद्यालय निगडीगावठाण दक्षिण बाजू तळमजला खोली क्रमांक 1
# हडपसर येथील 111 रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय, माळवाडी हडपसर (मुख्य इमारत) खोली क्रमांक 3

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.