Maval: शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसद महारत्न पुरस्कार’

Shiv Sena MP Shrirang Barne awarded 'Parliament Maharatna Award' खासदार बारणे यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बीजेडीचे खासदार भातृहारी मेहताब यांनाही  'संसद महारत्न पुरस्कार' जाहीर झाला आहे. 

एमपीसी न्यूज  – सोळाव्या लोकसभेत सलग पाच वर्ष  ‘संसद रत्न’ या पुरस्काराने गौरव झालेले मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वोत्कृष्ठ संसदीय कामकाजासाठी एकदा दिला जाणारा ‘संसद महारत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

लोकसभेत महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध विषयांवर संसदेत उपस्थित केलेले प्रश्‍न, सर्वाधिक चर्चेतील सहभाग संसदेमधील उपस्थिती तसेच स्थानिक खासदार विकास निधीचा संपूर्ण वापर या अष्टपैलू कामगिरीबद्दल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना चेन्नई येथील पंतप्रधान पाँईंट फाऊंडेशनच्या वतीने  मागील सलग पाच वर्षे ‘संसद रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

सातत्याने सलग पाचवर्षे ‘ संसदरत्न ‘ पुरस्कार मिळालेल्या लोकप्रतिनिधीला सर्वोत्कृष्ट संसदीय कामकाजासाठी एकदा ‘संसद महारत्न पुरस्कार’ दिला जातो.

मागील पाच वर्षातील कामगिरी, सलग पाच वर्ष ‘संसदरत्न’  पुरस्काराने झालेला सन्मान यामुळे संसदीय कामकाजासाठीचा ‘संसद महारत्न पुरस्कार’ खासदार श्रीरंग बारणे यांना जाहीर झाला आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात हा मानाचा तुरा खोवला गेला आहे. 17 व्या लोकसभेतही खासदार बारणे यांनी कामगिरीत सातत्य राखले आहे.

खासदार बारणे यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बीजेडीचे खासदार भातृहारी मेहताब यांनाही  ‘संसद महारत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील खासदार बारणे, सुळे आणि ओडिसातील मेहताब या तीन खासदारांना ‘संसद महारत्न पुरस्कार’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सुळे यांना ‘संसद महारत्न पुरस्कार’ आणि ‘संसदरत्न’ हा  पुरस्कार जाहीर झाला आहे.

तर, महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, भाजपचे डॉ. सुभाष भामरे आणि भाजपच्या डॉ. हिना गावीत यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. संसदीय कार्यमंत्री मंत्री अर्जुन मेघवाल या पुरस्कार समितीचे अध्यक्ष आहेत.

तीनसदस्यीय समितीत सलग पाचवर्षे ‘संसद रत्न’  पुरस्कार मिळाल्याने खासदार बारणे यांची या महत्वपूर्ण समितीत सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे हे सर्व शक्य शक्य झाले आहे. नागरिकांच्या विश्वासाला मी पात्र ठरलो आहे. संधीचा उपयोग नागरिकांसाठी करत आहे. हा सन्मान माझा नसून मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांचा आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like