BNR-HDR-TOP-Mobile

Maval : श्री कृष्ण मित्र मंडळाच्या जिवंत देखाव्यातून समाज प्रबोधन

एमपीसी न्यूज : सुदूंबरे येथील श्री कृष्ण मित्र मंडळाने यावर्षी “मावळ पॅटर्न” व “देवाक काळजी रे” हे दोन जिवंत देखावे सादर केले आहेत. 

या जिवंत देखाव्यातून समाज प्रबोधन करण्यात येत आहे, या मंडळामधील कार्यकर्ते स्वतः हे देखावे सादर करतात. या देख्याव्यातून तरूण वर्गावर सुसंस्कार घडवण्याचे काम होत आहे. समाजात शिक्षण असून ही पैसा टाकला की नोकरी मिळते पण स्वबळावर कष्टाची लाज न बाळगता उद्योगधंदा करून यशस्वी उद्योजक होऊ शकतो हाच संदेश या दोन देखाव्यातून देण्यात आला आहे.

HB_POST_END_FTR-A2

.