Maval : मावळ परिसरात कडाडली खासदार बारणे यांच्या प्रचाराची तोफ

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि. 5) खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराची तोफ कडाडली. लोणावळा, खंडाळा, कामशेत, कान्हे, साते, वडगाव, सोमाटणे येथे ढोलताशाच्या गजरात मिरवणूक, जंगी स्वागत आणि घोषणांच्या निनादात प्रचार दौरा झाला. किराणा, कापड, सराफ, टपरीचालक यांच्याकडून ठिकठिकाणी बारणे यांचे स्वागत करण्यात आले. बारणे यांनी दुकानांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. जैन आराधना भवन, कामशेत येथील सागर समुदायाचे अर्चित अर्पित गुणाश्रीजी महाराजसाहेब यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी आमदार बाळा भेगडे, प्रचारप्रमुख भास्करराव म्हाळसकर, गणेश भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, पंचायत समिती सदस्य नितीन मराठे, पार्वती शिंदे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, आरपीआयचे सूर्यकांत वाघमारे, संदीप काकडे, कार्ला येथील शरद हुलावळे, सागर हुलावळे, सचिन हुलावळे, विशाल हुलावळे, प्रदीप हुलावळे, सनी हुलावळे, आदित्य हुलावळे, कळू हुलावळे, भाऊसाहेब हुलावळे, अमोल इंगवले, अमर हुलावळे, सतीश मोरे, चंद्रकांत गायकवाड, खामशेत येथील लहू गायके, नितीन गायके, बाळू गायके, अतुल कार्लेकर, नायगाव येथील मारुती वावरे, बाळू शिंदे, खंडू वावरे, शिवराम चोपडे, दशरथ वावरे, बाळू चोपडे, दिलीप वावरे, रघुनाथ चोपडे, शांताराम येवले, चंद्रकांत चोपडे, दत्ता वावरे, विकी वावरे, अतुल चोपडे, युवराज चोपडे, धोंडीबा येवले, बाला चोपडे, निलेश वावरे, सोमनाथ वावरे, अनिल चोपडे, अस्लम मुलाणी, कान्हे येथील अक्षय गायकवाड, शांताराम सातकर, सुभाष ओव्हाळ, राजू सातकर, गिरीश सातकर, रवींद्र भेगडे, विजय सातकर, गौतम रोकडे, साते येथील संदीप शिंदे, सागर आगळमे, आनंद आगळमे, वडगाव येथील मेहेंद्र म्हाळसकर, सुधाकर ढोरे, भूषण मुथा, रवींद्र काकडे, नितीन कुडे आदी उपस्थित होते.

बाळा भेगडे म्हणाले, “नागरिकांनी प्रचार दौऱ्यात सक्रिय सहभाग घेऊन खासदार बारणे यांच्या विजयावर शिक्का मारला आहे. केंद्रापासून स्थानिक पातळीपर्यंत एकाच विचाराचे सरकार आहे. त्यामुळे कोट्यवधींची विकासकामे झाली आहेत. काही कामे सुरु आहेत. ही विकासाची गंगा अविरत वाहण्यासाठी महायुतीच्या सरकारला विजयी करावे. मावळच्या शेतक-यांवर झालेल्या गोळीबाराचा बदला विरोधकांना मताची गोळी मारून घ्यावा, असेही भेगडे म्हणाले.

खासदार बारणे म्हणाले, “मोदींनी मागील पाच वर्षांच्या कालावधीत देशाची मान जगभरात उंचावेल अशी कामगिरी केली. देशाला नेतृत्व देणारा आणि देशाचे भविष्य घडविणारा पंतप्रधान म्हणून मोदींची ओळख तयार झाली आहे. अशा पंतप्रधानांसोबत काम करता आलं ते केवळ मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे. सर्वसामान्य नागरिकांबाबत सकारात्मक भूमिका नेहमी घेतली. देशाची सत्ता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या हाती देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. विरोधी पक्षाचे अस्तित्व दिवसेंदिवस संपत चाललं आहे. महायुतीची ताकद वाढत आहे. त्यामुळे महायुतीचा विजय होणार असल्याचे विश्वास आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.