Maval : आंदर मावळात खासदार बारणे यांनी घेतला कार्यकर्त्यांसोबत जेवणाचा आनंद

महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांचा आंदर मावळ भागात प्रचार दौरा

एमपीसी न्यूज- गावोगावी भेटीगाठी करत प्रचार दौरा सुरु असताना बोरवली गावानजिक निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या अंजनी माता मंदिरात शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी कार्यकर्त्यांसोबत दुपारच्या जेवणाचा आनंद घेतला.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवारी) आंदर मावळ भागात प्रचार दौरा काढण्यात आला. गावोगाव जाऊन प्रमुख कार्यकर्ते तसेच मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. प्रचार दौऱ्याची सुरुवात मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी येथून झाली. त्यानंतर जांभूळ, टाकवे बुद्रुक, फाळणे, माऊ, वडेश्वर, नागाथली, कुसवली, बोरवली, काम्ब्रे, डाहुली, खांडी, सावळा, माळेगाव आदी गावांना बारणे यांनी भेटी दिल्या.

यावेळी आमदार बाळा भेगडे, सभापती सुवर्णा कुंभार, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, प्रचारप्रमुख भास्करराव म्हाळसकर, तालुका प्रमुख राजू खांडभोर, नंदा सातकर, शुभांगी दरेकर, मदन शेडगे, यशवंत तुरडे, विभागप्रमुख जयदास ठाकर, सुनील शिंदे, सहसंघटक सोमनाथ कोंडे, हनुमंत ठाकर, आनंद जांभळे, रमेश नगरकर, शेकापचे राजू लष्करी, संदीप लष्करी, संतोष करवंदे, संतोष साकोरे, संतोष खांडभोर, प्रशांत ढोरे, अनिकेत घुले, रामनाथ वारिंगे, शरद हुलावळे, राजू गाडे, संजय शिंदे, सचिन शिंदे, दिनेश शिंदे, विलास शिंदे, सुमित लालगुडे, शारदा शिंदे तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बोरवली गावाजवळ असलेल्या अंजनी माता मंदिरात सर्व कार्यकर्त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. सर्वसामान्य नागरिकांमध्ये खासदार बारणे यांची प्रतिमा मनमिळाऊ नेता अशी आहे. ती प्रतिमा बारणे यांनी प्रचाराच्या धामधुमीतही कायम ठेवली आहे. बोरवली गावाजवळ डोंगराच्या कुशीत असलेल्या अंजनी माता मंदिरात सर्व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी जेवणाचा आनंद घेतला. कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर बसून पत्रावळीमध्ये जेवण केले. आपला नेता आपल्या मांडीला मांडी लावून जेवण करत आहे, ही बाब सर्व कार्यकर्त्यांसाठी उत्साह भरणारी होती. यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणखी जोमाने कामाला लागले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.