BNR-HDR-TOP-Mobile

Maval : वर्धमान जैन श्रावक संघाच्या मिरवणुकीत खासदार बारणे यांचा सहभाग

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त थेरगाव येथील वर्धमान जैन श्रावक संघाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवसेना-भाजप-रिपइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांनी सहभाग घेतला. वाकड ते थेरगाव या मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली.

भगवान महावीर यांच्या मुरवणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह प्रकाश बाफना, मोहनलाल संचेती, जैन समाजातील सर्व अनुयायी आणि समाजबांधव सहभागी झाले.

महावीर जयंती हा उत्सव जैन समाजातील प्रमुख उत्सव आहे. जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त हा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी जैन मंदिरांना आकर्षक पद्धतीने सजविण्यात येते. गरीब आणि गरजू लोकांना यानिमित्त दान करण्यात येते. त्याचबरोबर जैन समुदायकडून अहिंसा मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर थेरगाव येथील वर्धमान जैन श्रावक संघाच्या वतीने अहिंसा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत खासदार बारणे सहभागी झाले. ‘भगवान महावीर यांनी बारा वर्ष कठीण तपश्चर्या करून प्राप्त केलेले ज्ञान त्यांनी पुढे आयुष्यभर सर्वांना दिले. अनुयायी बनवून त्यांच्या ज्ञानाचा प्रसार केला. त्यांचे ज्ञान आणि अहिंसेचा संदेश समाजात सर्वत्र पोहोचायला हवा’, अशा भावना बारणे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

HB_POST_END_FTR-A4

.