BNR-HDR-TOP-Mobile

Maval : पवना धरणाचे सहा दरवाजे उघडले; 5600 क्युसेकने विसर्ग सुरु

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पिण्याचे पाणी पुरविणारे मावळ तालुक्यातील पवना धरण 98 टक्के भरले असून धरणातून सध्या हायड्रो मार्गे 1400 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने आज दुपारी 12.30 च्या दरम्यान धरणाचे दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या दरवाजांमधून 4200 क्युसेक असा एकूण 5600 क्युसेकने विसर्ग सुरु आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

पवना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असून मागील 24 तासात धरण परिसरामध्ये 115 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे आज, शनिवारी सकाळी धरणातील पाणीसाठा 98 टक्क्यांवर पोहचला आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून 1200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला.

  • पावसाचा जोर वाढत असल्याने धरणाचे दरवाजे उघडत दरवाजांमधून आणि हायड्रोद्वारे 4200 क्युसेक याप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज दुपारी साडेबारा नंतर एक फुटाणे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सुमारे 5600 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरु केल्यामुळे नदी काठच्या गावांनी, नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

HB_POST_END_FTR-A2

.