मंगळवार, जानेवारी 31, 2023

Maval : राष्ट्रीय कुंगफू स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या सिया लक्ष्मण चिमटेला सुवर्ण

एमपीसी न्युज – सातवी राष्ट्रीय कुंगफू अजिंक्यपद स्पर्धा सुरत (गुजरात) येथे पार पडली. या स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या सिया लक्ष्मण चिमटे हिला सुवर्णपदक मिळाले.(Maval)महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे सियाचा सत्कार करण्यात आला.

सातव्या राष्ट्रीय कुंग फू अजिंक्यपद स्पर्धेमध्ये इंद्रायणी महाविद्यालयाच्या सिया लक्ष्मण चिमटे हिला सुवर्णपदक मिळाले. दि 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सुरत (गुजरात) येथे राष्ट्रीय कुंग फु अजिंक्यपद स्पर्धा पार पडली.

इंद्रायणी महाविद्यालयात द्वितीय वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या कु. सिया लक्ष्मण चिमटे हिने अनुक्रमे एक सुवर्ण व एक रजत पदक मिळविले. 19 वर्ष गटाखालील 55 ते 60 वजनी गटात किक बॉक्सिंग या खेळात सुवर्ण पदक मिळाले तर खुल्या गटात रजत पदक मिळाले.

Lonavala news: पुणे ते मुंबई सद्भावना सायकल रॅली

महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे सियाचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य (Maval) डॉ. एस के मलघे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुरेश थरकुडे, डाॅ मधुकर देशमुख, डाॅ विजयकुमार खंदारे, प्रा के व्ही अडसुळ,प्रा विद्या भेगडे, प्रा रूपकमल भोसले, प्रा रोहित नागलगाव, प्रा दीप्ती पेठे व  सर्व  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

तिच्या या यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, उपाध्यक्ष दीपक शहा, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस के मलघे यांनी कौतुक व अभिनंदन केले.

Latest news
Related news