Maval : …म्हणून प्राथमिक विद्यालयाची इमारत बांधणार -सुनील भोंगाडे

एमपीसी न्यूज – आई-वडिलांच्या संस्कारातून त्यांनी केलेल्या काबाड कष्टातून माझे व्यक्तिमत्त्व साकारले त्यातूनच विद्यार्थ्यांसाठी काही तरी करण्याची उमेद व कुंटुबातील सर्व सदस्यांनी दिलेला पाठींबा याच्या जोरावर मात्या-पित्याच्या संस्कारातून प्रवाहित होऊन ज्ञानाची गंगोत्री पवनानगर परिसरातील विद्यार्थ्यांंना मिळावी, ह्या हेतूने प्राथमिक विद्यालयाची इमारत बांधणार आहे, असे मत मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे यांनी पवनानगर येथे केले.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलातील मिराबाई दशरथ भोंगाडे प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचे व माजी विद्यार्थी सांस्कृतिक भवन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सुनील भोंगाडे यांनी पवनानगर येथे व्यक्त केले.

यावेळी बोलताना संस्थेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले की, पवनानगर सारख्या दुर्गम भागात बालवाडी ते पदवीपर्यंतचे शिक्षण एकाच छताखाली मिळणार असून प्राथमिक विभागासाठी इमारतीची आवश्यकता होती. परंतु समाजसेवेचा वसा घेतलेले आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी शैक्षणिक कार्य करण्याची उमेद असलेल्या भोंगाडे परिवाराने आज आपल्या आईच्या नावाने प्राथमिक विद्यालय सुरू करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

पवनानगर सारख्या दुर्गम भागात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचावणेचे काम नुमवि संस्थेच्या माध्यमातुन अध्यक्ष कृष्णराव भेगडे,संस्थेचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे करत असून त्याला हातभार म्हणून माळवाडी येथील भोंगाडे परिवाराने आपल्या कुंटुबातील मिराबाई दशरथ भोंगाडे प्राथमिक विद्यामंदिर शाळेची इमारत व माजी विद्यार्थांच्या मदतीने सांस्कृतिक सभागृह बांधणार असून त्याचा भुमिपुजन कार्यक्रम घेण्यात आला.

या इमारतीचे भूमिपूजन उद्योजक दशरथ भोंगाडे, मिराबाई भोंगाडे, श्री व सुनील भोंगाडे, विजय भोंगाडे, भरत भोंगाडे यांच्या हस्ते तर माजी विद्यार्थी सांस्कृतिक सभागृह भूमिपूजन माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष श्री व सौ काशिनाथ निंबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव व पवना शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे, संचालक सोनबा गोपाळे, महेश शहा, विद्यार्थी संघटना अध्यक्ष काशिनाथ निंबळे, शालेय समिती सदस्य नारायण कालेकर, उद्योजक मारुती भोंगाडे, छगन भोंगाडे, माजी ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दाभाडे, कामगार नेते अर्जुन जाधव, मोहन काळडोके, हभप शांताराम दाभाडे, अॅड.प्रविण भूतडा, राजेश राऊत प्राचार्य दशरथ ढमढेरे, पर्यवेक्षिका निला केसकर,पांडूरंग ठाकर, रोशनी मरांडे, भारत काळे, बाळासाहेब मंचरे यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव ढाकणे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.