Maval : बोरजमध्ये महिलांनी गाण्यातून घातले सुनील शेळके यांना साकडे

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील बोरज येथील ज्येष्ठ महिलांनी गाण्यामधून गावातील समस्या मांडून त्या समस्या सोडविण्यासाठी भाजपचे युवा नेते आणि तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांना साकडे घातले. या अभिनव पद्धतीने मांडलेल्या समस्या समजावून घेत बोरज गावचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही शेळके यांनी ग्रामस्थांना दिली.

गावभेट दौऱ्यात शेळके यांनी शनिवारी पाथरगाव, पिंपळोली, ताजे, बोरज, मळवली, सदापूर, देवले, पाटण व भाजे या गावांना तर रविवारी मुंढावरे, फांगणे, टाकवे खुर्द, शिलाटणे, दहिवली, वेहरगाव व कार्ला या गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. पाऊस असतानाही सर्व गावांमध्ये शेळके यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

बोरज गावात ज्येष्ठ महिलांनी गाण्यातून गावातील समस्या मांडल्या. त्या समस्या सुनीलआण्णा कशा दूर करतील, हे देखील लोकगीतातून सांगितले. लोकगीताच्या माध्यमातून अभिनव पद्धतीने गावच्या समस्या मांडण्याच्या या ज्येष्ठ महिलांच्या प्रयत्नाने शेळके भारावून गेले. या सर्व समस्या आपण वैयक्तिक लक्ष घालून सोडवू, असे वचन त्यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिले. सदापूर गावात महिला ढोल पथकाने संपूर्ण परिसर दणाणून टाकत शेळके यांचे धुमधडाक्यात स्वागत केले. शनिवारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत शेळके यांचा गाव भेट दौरा चालू होता.

रविवारी टाकवे खुर्द या गावात शेळके यांची रथातून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. मिरवणुकीतील महिलांचा सहभाग लक्षणीय होता. शिलाटणे गावात सर्वपक्षीय ग्रामस्थांची उपस्थिती होती. मध्यरात्री 12.30 वाजता कार्ला गावात दौऱ्याची सांगता झाली.

यावेळी गणेश केदारी, सहदेव केदारी, संतोष केदारी, दिनेश केदारी, विष्णू केदारी, जमुनाताई पटेकर, युसुफभाई इनामदार, नरेश वाल्हेकर, बबनराव आंबेकर, चेतन मानकर, रवींद्र वाघमारे, प्रभाकर तिकोणे, संदीप तिकोणे, तुषार महाराज दळवी, लक्ष्मण बालगुडे, बाबुराव केदारी, रामचंद्र बालगुडे, प्रकाश केदारी, सुरेश केदारी, रामभाऊ पिंगळे, संदीप बोंबले, सुनील गुजर, सुभाष पिंपळे सर, विष्णू बोंबले, नरहरी आबा केदारी, काळूराम केदारी, शेखर वाघमारे, सरपंच सुशांत ढमाले, नवनाथ गायकवाड, ज्ञानदेव मोरे, शिवाजी भानुसघरे, भाऊसाहेब मावकर, सुरेश गायकवाड, सरपंच सागर हुलावळे, सचिन हुलावळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.