Vadgaon Maval News : मावळ तालुका कृषी पर्यटन व्यवसायासाठी अनुकूल

आई कृषी पर्यटन केंद्राद्वारे आयोजित भात कापणी महोत्सवात सुप्रिया करमरकर यांचे मत

एमपीसी न्यूज – मावळ तालुका निसर्गाने संपन्न असून या ठिकाणी सह्याद्रीच्या रांगांमध्ये ऐतिहासिक गड-किल्ले, लेण्या, तसेच धार्मिक स्थळे, ट्रेकिंग आदी नैसर्गिक सुविधा मुबलक असल्याने मावळ परिसर पर्यटकांचे आकर्षण आहे. त्यामुळे मावळ तालुका हा कृषी पर्यटन व्यवसाय करण्यास अतिशय अनुकूल असून, येथील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायाबरोरच कृषिपर्यटन व्यवसाय करावा, असे आवाहन राज्य कृषी पर्यटन विभागाच्या सहाय्यक संचालक सुप्रिया करमरकर यांनी केले. 

शिळाटणे येथील आई कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने आयोजित भात कापणी महोत्सवात करमरकर बोलत होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मावळ तालुका कृषीअधिकारी दत्तात्रय पडवळ, सहकारमहर्षी माऊली दाभाडे, माजी उपसभापती शरद हुळावले, संत तुकाराम पादुका मंदिरचे अध्यक्ष भरत येवले,युवक कॉंग्रेस मावळचे अध्यक्ष विलास मालपोटे, मा.सरपंच शिवाजी भानुसघरे, विनायक बधाले, सोनबा गोपाळे गुरुजी,  संभाजी हुळावले, हनुमंत तिकोणे, संभाजी केदारी, भरत साठे, अंकुश टाकळकर, आई कृषी पर्यटन केंद्र शिलाटणेचे संचालक संगिता भानुसघरे, मावळ तालुका सचिव संघटना अध्यक्ष गणपत भानुसघरे आदी उपस्थित होते.

मावळ तालुका निसर्गाने संपन्न असून या ठिकाणी सह्याद्रीच्या रांगांमध्ये ऐतिहासिक गड-किल्ले, लेण्या, तसेच धार्मिक स्थळे, ट्रेकिंग आदी नैसर्गिक सुविधा मुबलक असल्याने पर्यटकांचे आकर्षण आहे. असे करमरकर यांनी सांगितले. तर या सर्व सोयी सुविधांचा फायदा शेतकऱ्यांनी कृषी पर्यटक केंद्रे सुरु करण्यासाठी करावा असे सहकार महर्षी माउली दाभाडे यांनी यावेळी सांगितले.

या भात कापणीचे आयोजन आई कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका संगीता भानुसघरे व गणपत भानुसघरे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन भानुसघरे, मधुकर भानुसघरे आणि सचिन भानुसघरे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.