Maval SSC Result : मावळ तालुक्याचा निकाल 94.73 टक्के; 30 शाळांचा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा (इयत्ता दहावी) निकाल शुक्रवारी (दि. 2) जाहीर झाला. या परीक्षेसाठी मावळ (Maval SSC Result) तालुक्यातील 5 हजार 71 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील चार हजार 804 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा निकाल 94.73 टक्के लागला असून 30 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

Chakan : पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्तीमुळे चाकण एमआयडीसीमध्ये लोड शेडिंगची शक्यता 

मावळ (Maval SSC Result) तालुक्यातील 83 शाळांमधून पाच हजार 94 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील पाच हजार 71 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. एक हजार 215 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आले आहेत. एक हजार 868 विद्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाले. एक हजार 362 विद्यार्थ्यांना द्वितीय तर 359 विद्यार्थी काठावर पास झाले आहेत. तालुक्याचा निकाल 94.73 टक्के लागला आहे. पाच हजार 71 पैकी चार हजार 804 विद्यार्थी पास तर 267 विद्यार्थी नापास झाले आहेत.

100 टक्के निकाल लागलेल्या तालुक्यातील शाळा –
ऑक्सिलम कॉन्व्हेंट हायस्कुल, लोणावळा
श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, कान्हे
कै. साथी बी एन राजहंस विद्यालय, परंदवडी
श्री ज्योतिबा विद्यालय, बेबडओव्हळ
श्रीराम विद्यालय, नवलाख उंब्रे
श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल, शिवली
श्री संत तुकाराम विद्यालय, शिवणे
कर्मवीर विद्यालय, आढले (बु)
पंचक्रोशी हायस्कुल, दारूंब्रे
सरस्वती विद्यामंदिर, तळेगाव स्टेशन
तुंग माध्यमिक विद्यालय, तुंग पवनानगर
आदर्श विद्यामंदिर, तळेगाव दाभाडे
भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, ओझर्डे
भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, बऊर
माध्यमिक विद्यालय, करुंज
जैन इंग्लिश स्कुल, तळेगाव दाभाडे
कांतीलाल शाह विद्यालय, चाकण रोड
श्री आनंदराम पी बी जैन इंग्लिश स्कुल, कामशेत
स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल, तळेगाव दाभाडे
महादेवी माध्यमिक विद्यालय, इंगळून
एम के एस एस एस आश्रमशाळा, कामशेत
कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कुल, तळेगाव दाभाडे
इंद्रायणी इंग्लिश स्कुल, तळेगाव दाभाडे
सुमन रमेश तुलसीयानी इंटरनॅशनल स्कुल, कामशेत
नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक दोन, तळेगाव दाभाडे
हंस इंग्लिश मिडीयम स्कुल
प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मिडीयम स्कुल
सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कुल
गीता विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल
लिली इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.