Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटन मंत्रीपदी – नारायणराव ठाकर

एमपीसी न्यूज – एक बुथ पंचवीस युथ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संकल्पना तालुक्यात राबवण्यासाठी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली अष्टविनायक मंगल कार्यालय टाकवे या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात नारायण ठाकर यांना नियुक्ति पत्र देण्यात आले. यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे युवक अध्यक्ष सुनिल दाभाडे ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष कैलास गायकवाड विद्यार्थी अध्यक्ष नवनाथ चोपडे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर सरचिटणीस सुदाम कदम जेष्ठ नागरीक सेलचे काळूराम मालपोटे शिक्षण प्र मं अध्यक्ष तुकाराम असवले अल्पसंख्यक अध्यक्ष अफताब सय्यद, बाबाजी गायकवाड, मारुती असवले विठ्ठल जाधव, छगन लष्करी, रामदास वाडेकर, गुलाब गभाले, कैलास खांडभोर, गोविंद अंभोरे, सुदामराव वाडेकर, भिकाजी भागवत, स्वामी जगताप, प्रल्हाद जांभूळकर, रघुनाथ मालपोटे, तुकाराम जाधव, संदिप आंद्रे, भरत जोरी, रमेश जाचक,शेखर मालपोटे, राघू तळपे आदी आंदर मावळातील सर्व सरपंच व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी ठाकर यांनी आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद भुषविलेले आहे तसेच ते वडेश्वर वि का सोसायटीचे संचालक आहेत. मावळ तालुक्यात त्यांचा राजकीय, सामाजिक, सांप्रदायिक कार्यात विशेष सहभाग असून संघटनात्मक कामकाजात मोठ्या हिरीरीने भाग घेतात. त्यांच्या निवडीने आंदर मावळात नवचैतन्य संचारले आहे. आणि त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.