Maval : टाटा मोटर्स कर्मचाऱ्यांचा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड येथील टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी आज महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज टाटा मोटर्सच्या कर्मचारी यांची भेट घेतली सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देत पाठिंबा जाहीर केला

यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, राजेश पिल्ले, माऊली थोरात, बिभीषण चौधरी, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, राजेंद्र ढवळे, अनिल राऊत, पांडुरंग पाटील, हनुमंत माळी, नाना सोनार, राजू पवार, रामचंद्र जमखंडी, तानाजी बारणे, बंडू बारसावडे आदी उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी टाटा मोटर्स मधील कामगारांची भेट घेतली. ‘श्रीरंग बारणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘महायुतीचा विजय असो’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशा घोषणांच्या जयघोषात कामगारांनी बारणे यांचे स्वागत केले. केंद्रामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार यायला हवे. महायुतीची ताकद वाढायला हवी, यासाठी सर्व स्तरातील नागरिकांमधून पाठिंबा मिळत आहे. टाटा मोटर्स कंपनीमधील कामगारांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

श्रीरंग बारणे म्हणाले, मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे मोठ्या प्रमाणात शहरात सूक्ष्म लघु आणि मोठ्या प्रकारचे उद्योग नव्याने सुरू होत आहेत. त्या माध्यमातून युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. उद्योगाला चालना मिळत आहे. त्यातून रोजगार उपलब्ध होत आहे. यामुळे युवा वर्गासह कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे. मतदान प्रक्रियेमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. टाटा मोटर्स मधील अनेक कामगारांनी आज महायुतीला पाठिंबा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.