Maval : तहानलेल्या मुलींसाठी झोपडीत गेलेला अक्षयकुमार ज्येष्ठ दाम्पत्याच्या पाहुणचाराने भारावला

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील शिळींब गावातील ज्येष्ठ दाम्पत्याच्या पाहुणचाराने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार भारावला. तहानलेल्या मुलींसाठी अक्षयकुमार झोपडीत गेला होता. यावेळी झोपडीतील पाहुणचारासह श्रीमंती अनुभवली. त्याने हा किस्सा सोशल मीडिया अकाउंट्सवर केला आहे. यात त्याने अक्षयने दोन फोटो पोस्ट केले असून ज्यामध्ये त्याच्यासोबत मुलगी नितारादेखील दिसत आहे. अक्षय एका झोपडीमध्ये दिसत आहे.

सध्या अक्षयकुमार कुटुंबियांसोबत मावळ तालुक्यातील शिळींब गावामध्ये सुट्टीनिमित्त फिरायला आला होता.अक्षयने टाकलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “आजचा मॉर्निंग वॉक छोट्या निताराच्या आयुष्यातील एक शिकवण बनला आहे. आम्ही या दयाळू आणि वयस्कर दाम्पत्याच्या घरी पाणी शोधत आलो होतो. पण, त्यांनी आमच्यासाठी खूपच स्वादिष्ट गूळ-चपाती बनवली होती. खरच दयाळू होण्यासाठी काहीही खर्च लागत नाही, पण यामुळे मिळते खूप काही.”

अभिनेता अक्षय कुमार कुटुंबासह पवना डॅम परिसरात सुट्टीसाठी आला होता. सकाळी आपल्या नितारा या मुलीसोबत मॉर्निंग वॉकला जाताना तहान लागल्याने तो एका झोपडीत गेला. तिथे त्या वृद्ध दाम्पत्याने त्याला जो पाहुणचार दिला त्याने तो भारावला.यावेळी त्याने घरातल्या वृद्ध आजी आणि आजोबांना प्यायला पाणी मागितलं. त्यांनी पाणी तर दिलंच पण त्याचबरोबर त्यांना गुळ आणि भाकरीही खायला दिली. अक्षय आणि त्याच्या मुलीचा पाहुणचार करणारं ते कुटुंब हे पवना डॅम परिसरातल्या शिंदेवाडीतलं ढमाले दाम्पत्य होतं.

त्यांनी अक्षयकुमार आणि त्याच्या मुलीला गुळ-भाकरी दिल्यानंतरही त्यांना तो अभिनेता अक्षयकुमार आहे हे माहितच नव्हतं. शेवटी अक्षयनेच त्याची ओळख करून दिली आणि हि बातमी सर्व गावात पोहोचली. त्यानंतर गावातले सर्वच लोक ढमाले आजोबांच्या झोपडीजवळ जमा झाले. अक्षयनेही सर्वांसोबत फोटो काढले आणि गावकऱ्यांना शुभेच्छा देत पुन्हा येण्याचं आश्वासन दिलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.