Maval : ऊसात आढळलेल्या ‘त्या’ बछड्यांना बिबट्याने नेले

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सांगवडे गावात मंगळवारी (दि. 3) सकाळी ऊसतोड कामगारांना काम करत असताना बिबट्याची दोन पिल्ले आढळली होती. या (बछड्यांना) पिल्लांना (मादी) बिबट्याने घेऊन गेली असल्याची माहिती प्राणीमित्र अनिल खैरे यांनी सांगितले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सांगवडे गावातील शेतकरी जालिंदर लिमण यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. सकाळी ऊस तोडणीचे काम करत असताना कामगारांना शेतात बिबट्याची दोन पिल्ले आढळली. त्यामध्ये एक नर तर एक मादी आहे. दोन्ही पिल्ले बेशुद्धावस्थेत होती. जालिंदर लिमण यांनी याबाबत वन अधिकाऱ्यांना माहिती दिली.

वन संरक्षण अधिकारी रेखा वाघमारे आणि त्यांचे बचाव पथक लिमण यांच्या शेतात दाखल झाले. त्यांनी पिल्लांना ताब्यात घेऊन प्रथमोपचार केले. पिल्लांचे वय 10 ते 15 दिवस असून त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या (मादी) बिबट्याकडे (आईकडे) सोडण्यात येणार आहे, असे रेखा वाघमारे यांनी सांगितले होते. त्याअगोदरच (मादी) बिबट्याने ‘त्या’ बछड्यांना घेऊन गेली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.