Maval : दीपावलीनिमित्त किल्ले तिकोणागड दिव्यांनी उजळला

एमपीसी न्यूज – दीपावली सण सर्वत्र अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. पण, शिवरायांचे गडकोट अंधारात, हा अंधकारही आता शिवरायांच्या मावळ्यांमुळे आता दिव्यांच्या प्रकाशाने दूर होऊ लागला आहे. गडकोटांवर आता सण साजरे होत आहेत. आपल्या जिवनाचा एक भाग म्हणून हे नागरिक आता गडकोटांकडे पाहू लागले आहेत.

हीच प्रचिती अंधारात पहूडलेल्या किल्ले तिकोणागडाने अनुभवली. ती म्हणजे दीपावलीनिमित्त आयोजित दीपोत्सवाने. धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान यांनी आज दीपावली किल्ले तिकोणा गडासोबत दीपोत्सवाने साजरी केली. प्रथमत: स्वच्छता, नंतर गडावरील तळजाई माता लेणी, वितंडेश्वर मंदिर, बालेकिल्ला पायऱ्या अशा विविध ठिकाणी दिवे प्रज्वलीत करून गड दिव्यांनी प्रकाशमय केला. त्यानंतर गडावर दीपावलीचे सण आहे हे जाणवू लागले आहेत. यानंतर पूजा करण्यात आली. तसेच सर्व एकत्र येऊन शिववंदना केली. या मंगलमय वातावरणात गड वेगळाच भासू लागला. नंतर सर्व गडउतार झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.