Maval News: पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, धरणात येणाऱ्या पाण्यात देखील घट

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. पवना धरण क्षेत्रात चार दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरणातील पाणीसाठ्यात मागील आठ दिवसांत वाढ झाली. मात्र, दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणा-या पाण्यात देखील घट झाली आहे. धरणात 49.85 टक्के पाणीसाठा झाला आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. मागील नऊ महिन्यांपासून शहरवासीय दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. त्यातच जून, जुलै संपला तरी पावसाचे आगमन झाले नव्हते.

त्यामुळे पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली होती. 31 जुलैपर्यंत धरणात 33.60 टक्के पाणीसाठा होता. पावसाची चिन्हे दिसत नसल्याने पाणीकपातीमध्ये आणखी वाढ करण्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले होते.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. पवना धरण क्षेत्रात चार दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

तर, 1 जूनपासून आजपर्यंत 780 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसांपासून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे.

आज धरणात 49.85 टक्के पाणीसाठा आहे. शनिवारी दिवसभरात दिवसभरात केवळ 8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.