Maval: टाकवे बुद्रुक येथील नवविवाहित दाम्पत्याचा आदर्श; कोरोनाग्रस्तांसाठी दिला 21 हजारांचा धनादेश

Maval: The newlywed couple from Takve Budruk set an example by donating Rs 21,000 for corona patients

0

एमपीसी न्यूज – जगभरात कोरोना विषाणूच्या संकटाने थैमान घातले असून आपल्या देशातही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या संकटाच्या काळात या रुग्णांवर यशस्वी उपचार करताना आर्थिकदृष्ट्या कमतरता राहू नये, यासाठी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील एका नवविवाहित जोडप्याने लग्नाच्या खर्चातून पैसे वाचवून कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी 21 हजार रुपयांचे योगदान देत समाजापुढे चांगला आदर्श घालून दिला. 

असवले व केदारी यांच्या परिवारातील तानाजी व माधुरी या वधू- वरांचा विवाह सोहळा कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने झाला.  या दोन्ही परिवारांनी विवाह सोहळ्यात होणारा खर्च टाळून त्या खर्चातील काही रक्कम कोरोनाग्रस्तांसाठी वापरण्यात यावी याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून 21 हजार रुपयाचा धनादेश मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील कुटुंबातील परिवाराने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत सर्वांनीच अशा पद्धतीचे अनुकरण केल्यास समाजात एक वेगळा आदर्श निर्माण होण्यास मदत होईल, असे गौरवोद्गार काढत तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी सरपंच शंकर केदारी, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन अनंता असवले, विशेष कार्यकारी अधिकारी संजीव असवले, उद्योजक दत्तात्रय असवले व  परिवारातील सदस्य उपस्थितीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like