Maval : कोंबड्यांच्या खरेदीसाठी ठेवलेले साडेतीन लाख रुपये बदली ड्रायव्हरने चोरले

एमपीसी न्यूज – कोंबड्या खरेदी करण्यासाठी पिकअपमध्ये (Maval) ठेवलेले तीन लाख 54 हजार रुपये घेऊन बदली ड्रायव्हर पळून गेला. हे घटना सोमवारी (दि. 23 मे) रात्री सात वाजता इंदोरी गावच्या हद्दीत घडली.

प्रल्हाद राजाराम म्हात्रे (वय 42, रा. पनवेल, जि. रायगड) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुजफर किताबली मंडल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा कोंबड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या पिकअप वरील ड्रायव्हर सुट्टीवर गेल्याने आरोपी मुजाफर याला बदली ड्रायव्हर म्हणून ठेवले. मुजाफर आणि क्लिनर मुखीम शब्बीर व रामा आडे असे तिघेजण मावळ तालुक्यातील इंदोरी गावच्या हद्दीत आले असताना मुजाफर याने दोन्ही क्लिनरला किराणा सामान आणण्याच्या बहाण्याने गाडीच्या खाली उतरवले.

Nigdi Burglary : प्राधिकरणात भर दिवसा घरफोडी; सव्वापाच लाखांचे दागिने लंपास

त्यानंतर कोंबड्या खरेदीसाठी (Maval) पिकअप गाडीच्या डिक्कीत ठेवलेली तीन लाख 54 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. दरम्यान पिकअप गाडी खेड तालुक्यातील येलवाडी येथे सोडून दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.