Maval : तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवणार; दत्तात्रय पडवळ यांचा संकल्प

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणुक ( Maval)  आयोगाने “तुतारी” हे निवडणुक चिन्ह दिले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे चिन्ह घराघरात पोहोचवणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमोर आव्हान आहे. त्यामुळे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी पक्षाचे तुतारी हे चिन्ह तालुक्यातील घराघरात पोहोचवणार असल्याचा संकल्प केला आहे. पक्षात फूट पडल्यानंतर पुन्हा पक्ष उभारणीसाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.

मावळ तालुका हा पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांना प्रथम पासूनच  मानणारा तालुका आहे.पक्षात उभी फुट पडल्यानंतर पवारसाहेबांना  मानणारे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते.  पवारसाहेब हे स्वताच्या पक्षाच्या  उभारणीसाठी खंबीरपणे उभे राहिले  असुन त्यांना मानणारे कार्यकर्तेही अंग झटकुन कामाला लागले असल्याचे  पडवळ यांनी यावेळी सांगितले.

नुकतेच पक्षाचे तुतारी या चिन्हाचे अनावरण स्वतः शरद पवार यांनी मोजक्या प्रमुख सहकार्यासह रायगड या ऐतिहासिक स्थळावर केले.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह  संचारला आहे.

Maval : माळवाडीच्या उपसरपंच पदी पूजा मयुर दाभाडे बिनविरोध

मावळ तालुका हा शिवरायांच्या शौर्याचा ऐतिहासिक परंपरा लाभलेला  तालुका असुन या तालुक्याचे कानाकोपरा,आणी गांवागांवात तसेच  घराघरात तुतारी हे निवडणुक चिन्ह  पोचविणार आहे. प्रत्येक गावच्या  वेशीवर पवार साहेबांचे कार्यकर्ते  तुतारीचे वादन करणार असल्याचे   पडवळ यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे   मावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी दोन दिवसांत बैठक घेऊन त्यावर निर्णय घेवून हे चिन्ह गावोगावी पोचविण्यासाठी भव्य “रॅली” काढुन  तुतारीचे स्टिकर,पोस्टर्स,भिंतीपत्रके  प्रत्येक गावात,प्रत्येक घरात तसेच वाड्यावस्त्यांवर वाटप करणार असल्याचे श्री पडवळ यांनी सांगितले

या दौर्‍यात पक्षाचे पदाधिकारी युवक अध्यक्ष विशाल वहिले,जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, तालुका अध्यक्ष ओबीसी सेल किसन कदम,महिला अध्यक्ष जयश्रीताई पवार,अध्यक्ष विद्यार्थी सेल अक्षय मु-हे,जिल्हा सरचिटणीस रमेश घोजगे,जिल्हा चिटणीस सुनिल शिंदे, आंदर मावळ युवक अध्यक्ष शंकर मोढवे,जेष्ठ नागरिक पांडुरंग दाभाडे, सांस्कृतिक सेल भरत राजिवडे, आध्यात्मिक सेल योगेश चोपडे, सहकार सेल सुधाकर वाघमारे आदी मान्यवर फिरणार ( Maval)  आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.