Maval: पार्थ पवार यांच्या पराभवाची ‘ही’ आहेत कारणे..

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव झाला. त्यांच्या विजयासाठी पवार घराण्यातील सर्व सदस्य मावळात तळ ठोकून होते. राज्यातील कार्यकर्त्यांनी देखील मावळात ठाण मांडले होते. तरी देखील पार्थ यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

अजित पवार यांनी स्वत: प्रचाराची सुत्रे हाती घेतली. परंतु, शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांच्या रणनितीसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. पार्थ यांचा मोठा मताधिक्याने पराभव झाला.

पार्थ पवार यांच्या पराभवाची कारणे-

भाषण न येणे, पहिल्याच भाषणामुळे ट्रोल
प्रचारादरम्यान सातत्याने ट्रोल
प्रचाराचे कोणतेही नियोजन नव्हते
मावळातून निवडणूक लढविण्याबाबतचे दिलेले अजब उत्तर
मतदारसंघात यापूर्वी कोणताही संपर्क नाही
राष्ट्रवादीचे गट-तट एकत्र आल्याचे दाखविले; प्रत्यक्षात त्याचे मतात रुपांतर झाले नाही
तरुण असुनही युवकांची मते वळवण्यात अपयश

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.