Maval : रानडुकराची शिकार करणा-या तिघांना अटक; वनपरिक्षेत्राच्या अधिका-यांची कारवाई

एमपीसी न्यूज – रानडुकराची शिकार करणा-या तिघांना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 11) मावळ तालुक्यातील नाणोली येथे शिरोता वनपरिक्षेत्राच्या अधिका-यांनी केली.

मीनश्री लाल बहेलिया (वय 38), मिंजूस राकेश बहेलिया (वय 20), चंदुरीबाई बाबुलाल बहेलिया (वय 32, सर रा. बहेलिया, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वनपरिक्षेत्र अधिका-यांनी माहितीनुसार, सोमवारी नाणोली येथे तिघेजण रानडुकरांची शिकार करीत आहेत. रानडुकरांची शिकार करून त्यांचे मांस विक्री करत आहेत, अशी माहिती शिरोता वनपरिक्षेत्र अधिका-यांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून वन विभागाच्या अधिका-यांनी तिघांना रंगेहाथ पकडले. आरोपींकडून रानडुकराचे मांस, शिकारीसाठी लागणारी हत्यारे, विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक वनविभाग श्रीलक्ष्मी, सहाय्यक वनसंरक्षक व्ही. एस. भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एस. पाटील, जी. एम. गंगावणे, एस. सी. रेड्डीपाटील, एस. ए. शेळके, जी. बी. गायकवाड, डी. डी. उबाळे, वाय. बी. जाधव, एस. एच. तांबे, व्ही. एस. शिर्के, जी. पी. धुळशेट्टे, एस. एस. ओव्हाळ यांच्या पथकाने केली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.