Maval : मावळ तालुक्यात स्वतःच्या हक्काची 15 हजार घरे बांधून देणार- बाळा भेगडे

एमपीसी न्यूज –  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून पहिल्या टप्प्यातील 1400 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2.5 लाख रुपयांप्रमाणे एकूण 35 कोटींच्या स्वतःच्या हक्काच्या घरकुल मंजुरी पत्रक प्रदान सोहळा हजारो लाभार्थ्यांच्या उपस्थित मोठया उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, एकनाथ  टिळे, माऊली  शिंदे,संत तुकाराम कारखाना संचालक पांडुरंग ठाकर, संदीप काकडे, अर्जुन पाठारे,बाळासाहेब घोटकुले,किरण राक्षे,प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे,पंतप्रधान आवास योजना प्रमुख धनंजय टिळे पंचायत समिती सदस्य निकिता घोटकुले,जिल्हा परिषद सदस्य अल्का  धानिवले,महिला अध्यक्ष नंदा  सातकर,बाळासाहेब जाधव,मावळ भाजपा सर्व लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

मावळ हे माझं कुटुंब आहे मावळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची सारी स्वप्न आपण पूर्ण करूया त्यांना त्यांच्या हक्काची घरे देण्याचा आमचा संकल्प असून आमच्या माध्यमातून मावळ तालुक्यात 3.5 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आज पहिल्या टप्प्यात 1400 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रक देण्यात आले, येणाऱ्या काळात मावळ तालुक्यात स्वतःच्या हक्काची 15 हजार घरे बांधून देणार असल्याची घोषणा राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी यावेळी केली.

मावळ तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला स्वतःच्या हक्काचे घर मिळवून दिल्याबद्दल सर्व लाभार्थ्यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे आभार मानून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्वजण खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहणार असल्याची खात्री  दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like