Maval: चांदखेडच्या एकाच कुटुंबातील पाचजणांना कोरोनाची लागण, मावळात 9 सक्रिय कोरोना रुग्ण

Maval: Two more corona 'positive' from 'that' patient's family in Chandkhed, 7 active corona patients in Maval

एमपीसी न्यूज – मावळात सलग पाचव्या दिवशी नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. चांदखेड येथे गुरुवारी (दि 21) 47 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याच रुग्णाच्या कुटुंबातील आई, पत्नी, मुलगा आणि भाचा अशा आणखी चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे आज तपासणीनंतर समोर आले आहे. त्यामुळे आता तालुक्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या नऊ झाली आहे. सातत्याने दररोज ही संख्या वाढत चालल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. 

चांदखेड येथील आणखी चार जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.  चांदखेड येथील एकूण 14 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी 10 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असल्याचेही त्यांनी सांगितले. आता चांदखेड गावातील कोरोना बाधितांची संख्या पाच झाली असून ते पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

चांदखेड मध्ये पहिला कोरोना पाॅझिटीव्ह आढल्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून 14 जणांना ‘हाय रिस्क’ व 29 जणांना ‘लो रिस्क’नुसार होम क्वारांटाइन केले होते. यातील ‘हाय रिस्क’मधील 14 जणांना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यातील रुग्णाची 65 वर्षीय आई, व 44 वर्षीय पत्नी तसेच 13 वर्षीय व 15 वर्षीय अशा मुलगा आणि भाचा अशा चौघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर उर्वरित 10 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती वडगाव मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

मावळात आतापर्यंत  11 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी तळेगाव स्टेशन व माळवडी येथील दोन नर्स कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यानंतर गेल्या पाच दिवसांत दररोज कोरोनाचे नवनवीन रुग्ण सापडत असल्याने मावळवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

मावळातील अहिरवडे येथे मंगळवारी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्या पाठोपाठ बुधवारी आंदरमावळातील नागाथली येथे कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला. त्यानंतर तिस-या दिवशी म्हणजे गुरुवारी वेहेरगाव व चांदखेड गावात प्रत्येकी एक रूग्ण सापडला. काल (शुक्रवारी) तळेगावात एका रुग्णाची भर पडल्याने तालुक्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या पाच झाली होती. आज (शनिवार) चांदखेड येथील चार कोरोनाबाधितांची वाढ झाल्याने सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 11 झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.