Maval: मतदारसंघात दोन हजार 504  मतदान केंद्रे 

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार 504  मतदान केंद्रे असून 2504 ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशिन्स वापरण्यात येणार आहेत. तसेच  447 ईव्हीएम आणि 748 व्हीव्हीपॅट मशिन राखीव ठेवण्यात आली आहेत. 
मावळमधून  21 उमेदवार रिंगणात आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण आणि पनवेल असे सहा विधानसभा मतदारसंघ सामाविष्ट आहेत. या मतदारसंघात  2 हजार 504 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. या वेळच्या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.
  • या संपूर्ण मतदार संघात मतदान प्रक्रियेसाठी 2504 ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशिन्स वापरण्यात येणार आहेत. याखेरीज 447  ईव्हीएम आणि 748 ‘व्हीव्हीपॅट’ मशिन राखीव ठेवण्यात आली आहेत. पनवेल आणि चिंचवडमध्ये मतदारांची संख्या जास्त असल्याने पनवेलमध्ये सर्वाधिक 584, तर चिंचवडमध्ये 470 मशिनचा वापर करण्यात येणार आहेत. ऐनवेळी तांत्रिक मतदानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागल्यास त्यासाठी 14 हजार 488  कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रे

पनवेल – 584
कर्जत – 343
उरण – 339
मावळ – 369
चिंचवड –  470
पिंपरी – 399
एकूण –  2,504

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.