BNR-HDR-TOP-Mobile

Maval : उद्धव ठाकरे यांची उद्या काळेवाडीत जाहीर सभा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपाइं (ए), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या गुरुवारी (दि. 25) जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी दिली.

काळेवाडी फाटा येथील मोकळ्या मैदानात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. रिपाइं (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पुण्याचे विभागीय नेते, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत सभेला संबोधित करणार आहेत.

यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेत्या आमदार निलम गो-हे, खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर उपस्थित राहणार आहेत.

या सभेला भाजप, शिवसेना, रिपाइं (ए), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे कार्यकर्ते, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, महायुतीतर्फे करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3