Maval: वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनी आज (सोमवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तत्पुर्वी त्यांनी आकुर्डीतून प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढली.

निगडी, येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सातव्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी भारीपचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, एमआयएमचे अकिल मुजावार, शहनवाझ शेख, सुरेश गायकवाड उपस्थित होते. अर्ज भरण्यापुर्वी त्यांनी आकुर्डीतून प्राधिकरण कार्यालयापर्यंत मोठी दुचाकी रॅली काढली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.