Maval: पुसाणे विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी विकास वाजे तर उपाध्यक्षपदी गोरख वाजे

Maval: Vikas Waje elected as the president of Pusane vivid karyakari sanstha and Gorakh Waje as the vice president यावेळी अध्यक्षपदासाठी विकास वाजे व उपाध्यक्षपदासाठी गोरख वाजे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

एमपीसी न्यूज- पुसाणे (ता.मावळ) येथील शेतकरी सभासद असलेल्या पुसाणे विविध कार्यकारी विकास संस्थेच्या अध्यक्षपदी विकास शामकांत वाजे यांची तर उपाध्यक्षपदासाठी गोरख ज्ञानोबा वाजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष बाजीराव वाजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्तपदासाठी वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अध्यासी अधिकारी आर.पी.बनाईत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.

यावेळी अध्यक्षपदासाठी विकास वाजे व उपाध्यक्षपदासाठी गोरख वाजे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव बाळासाहेब सावंत यांनी काम पाहिले.

यावेळी संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर वाजे, हनुमंत वाजे, दत्तात्रय वाजे, ज्ञानेश्वर वाजे, परशुराम आवंढे, जनताबाई वाजे, भिमाजी रावडे, गोरख रावडे आदी उपस्थित होते. निवडीनंतर वाजे यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.