Maval: विसापूर किल्ल्यावर पुन्हा सापडले दोन तोफगोळे!

एमपीसी न्यूज – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड- विसापूर विकास मंचातर्फे विसापूर वरील शिवमंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर गड भ्रमंती करत असताना कार्यकर्त्यांना दोन तोफगोळे आढळून आले. मागील वर्षी याच ठिकाणी तीन तोफगोळे कार्यकर्त्यांना सापडले होते.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड- विसापूर विकास मंचातर्फे लोहगड व विसापूर किल्ल्यांवर गेली 19 वर्षे दुर्गसंवर्धनाचे काम चालू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विसापूर वरील शिवमंदिरात मंचातर्फे दीपोत्सव करण्यात आला शिव मंदिर परिसरात दिवे लावण्यात आले व रांगोळ्या काढण्यात आल्या. या कार्यक्रमानंतर कार्यकर्ते गड भ्रमंती करत असताना दारुगोळा कोठारासमोर कार्यकर्त्यांना एक तोफगोळा जमिनीतून वर आलेला दिसला तो तोफगोळा बाहेर काढल्यानंतर अन्य ठिकाणी शोधले असा अजून एक तोफगोळा कार्यकर्त्यांना सापडला. हे दोन तोफगोळे सापडल्याचे पुरातत्व विभागाला कळवण्यात आले आहे.

मागील वर्षी याच ठिकाणी तीन तोफगोळे कार्यकर्त्यांना सापडले होते ते पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यावर्षी मंचाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उत्खनन करण्याची पुरातत्व विभागाला मागणी केली तरी पुरातत्व विभागाकडून काही प्रतिसाद मिळाला नाही याची खंत मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केली. आता तरी पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन करून अजून काही सापडते का हे पहावे, अशी अपेक्षा करतो असे सचिन टेकवडे यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

सापडलेले तोफगोळे हे कुल्फी तोफगोळे प्रकारातील असून यामध्ये तोफेत दारू भरून नंतर वाती द्वारे हे उडवले जातात, अशी माहिती डेक्कन कॉलेजचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी दिली.

सदर या तोफगोळ्याचे वजन हे पाच ते दहा किलो आहे याप्रसंगी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, उपाध्यक्ष सचिन निंबाळकर, सचिव सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, अमोल गोरे, मनिष मल हे सर्व उपस्थित होते. आज शिवमंदिरातील दीपोत्सवाची तयारी सागर कुंभार व मनीष मधील यांनी केली. सचिन निंबाळकर यांनी अभिषेक केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.