Maval : लोहगड विसापूर विकास मंचच्या अध्यक्षपदी विश्वास दौंडकर

एमपीसी न्यूज – लोहगड विसापूर विकास मंचची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. मंचच्या अध्यक्षपदी विश्वास दौंडकर यांची तर कार्याध्यक्षपदी सागर कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटन मावळ्यांचे, संवर्धन गडकिल्ल्यांचे असे ध्येय असलेल्या लोहगड विसापूर विकास मंचची नवीन कार्यकारिणी शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात व मंचचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी नुकतीच जाहीर केली. मंचाच्या अध्यक्षपदी  विश्वास दौंडकर निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी  सागर कुंभार यांची नियुक्ती झाली. तसेच चेतन जोशी यांची सचिवपदी, उपाध्यक्षपदी अमोल गोरे, गणेश उंडे प्रसिद्धीप्रमुख, संदीप गाडे सल्लागार, सचिन निंबाळकर सहसल्लागार, अनिकेत आंबेकर खजिनदार, गौरव गरवड सहखजिनदार अशी इतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

कार्यकारिणी मधील सदस्य म्हणून अमोल मोरे, चेतन बैकर, सोमनाथ बैकर, महेंद्र बैकर, शिवतेज शेंडे, संदीप भालेकर, अजय मयेकर, कैलास वाघमारे, मुकुंद तिकोणे, रुपेश लोखंडे, विठ्ठल करे व बाळू ढाकोळ आदींच्या नियुक्त्या या प्रसंगी जाहीर करण्यात आल्या.

दुर्गसंवधनासाठी काम करणाऱ्या लोहगड विसापूर विकास मंचने आतापर्यंत लोहगड किल्ल्यावरील दरवाजा, शिवमंदिर, पायथ्याशी साकारत असलेले भव्य शिवस्मारक अशी कामे केली आहेत तर विसापूर किल्ल्यावरील पडलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मंचातर्फे पाठपुरावा करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.