Maval: अंदर मावळ भाजप युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षपदी विठ्ठल तुर्डे

Maval: Vitthal Turde as the president of andar Maval BJP Yuva Morcha Vidyarthi Aghadi भाजप विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

एमपीसी न्यूज – अंदर मावळ भाजप युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षपदी विठ्ठल दामु तुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

माजी मंत्री संजय भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, युवक अध्यक्ष संदीप काकडे, अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, कार्याध्यक्ष प्रशांत शिंदे, भाजप विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संस्कार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

अंदर मावळातील विद्यार्थी व तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे प्रश्न व समस्या मार्गी लावणार असल्याचे मत विठ्ठल तुर्डे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.