Maval ; मजबूत भारतासाठी महायुतीला विजयी करा – रामशेठ ठाकूर

तेलगू, कानडी, ओडिसी, तामिळ बांधवांचा बारणे यांना पाठिंबा

नवीन पनवेल येथे विविध समाज बांधवांच्या बैठका

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मागील पाच वर्षात उजळली आहे. आर्थिक विकासासह सर्वच क्षेत्रात भारताने उसळी मारली आहे. एकसंघ असलेला भारत मजबूत होत आहे. भारताला यापुढे आणखी मजबूत करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून देणे आणि त्यामाध्यमातून नरेंद्र मोदी यांना निवडून देणे आवश्यक आहे, असे मत माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले.

आंध्र, कर्नाटक, तामिळ, ओडिसी, मल्याळम, उत्तर भारतीय आणि सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ बांधवांच्या बैठकी घेतल्या. त्यावेळी रामशेठ ठाकूर बोलत होते. सर्व समाज बांधवांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा दर्शवला. यावेळी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, महापौर डॉ. कविता चौटमल, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सभागृह नेता परेश ठाकूर, नगरसेवक संतोष शेट्टी, भास्कर शेट्टी, रामदास शेवाळे, श्रीधर वासाला, श्रीनिवास, महेश कोलारे, सतीश राजू, शंकर राव, जगूमनी चक्र, रवींद्र पिल्ले आदी उपस्थित होते.

“भारताच्या काना-कोपऱ्यातून विविध जाती, धर्म, प्रांतातून आलेले लोक पनवेल शहरात एकत्रितपणे आनंदाने राहतात. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्व समाजबांधवांनी ठरवले आहे. सर्व स्तरातून बारणे यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाच्या माध्यमातून देशहितामध्ये सहभागी व्हावे”, असे आवाहन ठाकूर यांनी केले.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, “मागील पाच वर्षांपासून महायुतीचे सरकार देशात सक्षमपणे काम करीत आहे. ही निवडणूक देशहिताची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंडपणे देशासाठी काम करतात. आपल्याला केवळ एकदाच मतदानाच्या माध्यमातून देशहिताचे काम करायचे आहे. देशासाठी आपलं प्रत्येकाचं मत महत्वाचं आहे. महाराष्ट्रात सर्व जाती, धर्म आणि प्रांतातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. हा एकोपा कायम ठेवायचा आहे.

आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, “भारतातील प्रत्येक नागरिकाला विकास हवा आहे. मोदी सरकारने त्या प्रत्येक नागरिकाची विकासाची भूक भागवली आहे. विकासाचा आलेख चढता ठेवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायला हवेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोंढाणा आणि बालगंगा तलावाच्या कामात भ्रष्टाचार केला. त्यामुळे आज पनवेल शहरात पाण्याचा प्रश्न समोर येत आहे. पण महायुतीच्या माध्यमातून त्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. महायुतीने पारदर्शक कारभार केला आहे. अशा विकासाभिमुख सरकारसाठी मतदान करा”असे आवाहन ठाकूर यांनी कले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.