Maval : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 21 जणांना वडगाव मावळ न्यायालयाकडून दंड

एमपीसी न्यूज – संचारबंदीचे पालन न करणाऱ्या 21 जणांना वडगाव मावळ प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांनी प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास सात दिवसांची कोठडी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीची अंमलबजावणी पोलिसांकडून काटेकोरपणे केली जात आहे. संचारबंदीचे पालन न करणाऱ्या लोणावळा शहर पोलिसांनी तीन, कामशेत पोलिसांनी सहा आणि वडगाव मावळ पोलिसांनी 13 जणांना वडगाव मावळ न्यायालयात हजर केले.

वडगाव मावळ न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी 21 जणांना प्रत्येकी एक हजार आर्थिक दंड ठोठावला आहे. तर दंड न भरल्यास आरोपींना सात दिवसांची साधी कैद होणार आहे.

दंड ठोठावलेले आरोपी –

लोणावळा शहर – फिरोज लतीफ शेख, गौतम देवराव सपकाळ, नजीम हुसेन शेख

कामशेत – संदीप एकनाथ गावडे,  भाऊ नामदेव चिंचवडे,  संतोष बाबाजी पवार,  अनिल किसान केदारी,  लमजा जमाल खान,  अविनाश परशुराम मानकर

वडगाव मावळ – अतिष अनिल डावरे,  किशोर रामदास ओव्हाळ,  राहुल उत्तमराव गोरले,  रामदास चंद्रशेखर यादव,  तुफेल अलिहसन अन्सारी,  उमेश किसन माने,  उमर शहनवाज फारूक,  प्रसाद किरण देवघरे,  शंकर भारत दास,  अनिकेत विठ्ठल वाळुंज, चंपालाल परमार बोराना,  रमेश उत्तम तळवे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.