Maval : वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अध्यक्षपदी अ‍ॅड. विठ्ठल पिंपळे

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी अ‍ॅड. विठ्ठल दगडू पिंपळे यांची निवड केली आहे. यावेळी नूतन कार्यकारिणीही जाहिर करण्यात आली.

संस्थापक अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. विठ्ठल दगडू पिंपळे, उपाध्यक्ष अ‍ॅड. धनंजय जनार्दन कोद्रे आणि अ‍ॅड. सोमनाथ सीताराम पवळे, सचिव अ‍ॅड. मुनाफ कय्युम शेख व अ‍ॅड. सुधीर संभाजी भोंगाडे, खजिनदार अ‍ॅड. दिपक रमेश चौधरी तर, सदस्य म्हणून अ‍ॅड. स्वामी फुगे (सदस्य), अ‍ॅड. तन्वीर जागिरदार, अ‍ॅड. रेश्मा घोजगे- कराळे, अ‍ॅड. सारिका चिंधु पडवळ, अ‍ॅड. नेहा बुटाला- शिंदे आदींची निवड करण्यात आली.

वडगाव मावळ येथे सेशन कोर्ट, प्रांत ऑफिस, न्यायालय परिसरामध्ये पार्किंग, ग्रंथालय, विमा पाॅलिसी, ज्युनिअर वकिलांच्या समस्या सोडवणे, अनेक मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

                                  अ‍ॅड. दिपक रमेश चौधरी,                                                                                अ‍ॅड. सोमनाथ सीताराम पवळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.