Maval: वडगावकरांनी घेतला ठोस निर्णय; लॉकडाऊन संपेपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 2 दुकाने राहणार सुरू

Maval: Wadgaonkar takes concrete decision; Shops will be open from 9 a.m. to 2 p.m., until the lockdown ends

एमपीसी न्यूज – शासकीय आदेशांमध्ये वारंवार बदल केले गेल्यामुळे तळेगावातील लॉकडाऊनच्या वेळेत वारंवार बदल केले गेल्याने व्यापारी, नागरिक आणि पोलीस हैराण झाले असल्याचा अनुभव लक्षात घेऊन वडगावकरांनी बाजारपेठेच्या वेळेबाबत ठाम भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण पत्रकार संघाने यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. आता लॉकडाऊन उठेपर्यंत दुकाने सकाळी 9 ते 2 या वेळेत सुरू राहणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून वडगाव शहरातील औषध दुकाने, दवाखाने ही संपूर्ण दिवसभर चालू राहतील  व जीवनावश्यक सह सर्व प्रकारची दुकाने रविवार दि. 10 पासून लाॅकडाऊन उठेपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरू ठेवण्याचा एकमुखी निर्णय झाला.

मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्याबरोबर नगरपंचायतीत  चर्चा झाल्यानंतर राजेश बाफना, मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, आरोग्य समितीचे सभापती राजेंद्र कुडे यांनी पुढाकार घेऊन शहरातील सर्व व्यापा-यांची बैठक घेतली.

यावेळी सहाय्यक फौजदार विश्वास आंबेकर, हवालदार गणेश तावरे, अभय बाफना, उत्तम ओसवाल, भुषण मुथा, मनोज गुजराणी, प्रदीप बाफना, शांती कोठारी, महेंद्र बाफना, झुंबर कर्नावट, कैलास सोळंकी, चेतन कदम,बबलु कोठारी यांच्यासह पत्रकार विजय सुराणा, गणेश विनोदे, सुदेश गिरमे, सर्व प्रकारचे व्यापारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

मावळ तालुक्यात आजपर्यंत कोरोनाबाधित एकही रूग्ण नव्हता तळेगाव शहरात रूग्ण आढळ्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून तळेगाव, कामशेत, लोणावळा येथील व्यापा-यांनी गर्दी टाळण्यासाठी जो निर्णय घेतला. त्याच धर्तीवर वडगाव येथील व्यापा-यांनी दुपारी दोन पर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला.

आमच्या दुकानात गर्दी होणार नाही तसेच वेळेवर दुकाने बंद करू याची काळजी आम्ही सर्वजण घेऊ,  मात्र दुकानात  सेल्फी काढण्यासाठी एकाही नगरसेवकांनी  दुकानात येता कामा नये. याची काळजी नगरपंचायतीने घ्यावी, अशी सुचना पत्रकार विजय सुराणा यांनी यावेळी केली. त्याचबरोबर आगामी काळात कोणत्याही व्यापा-यांवर अन्याय झाला तर सर्वांनी एकमुखी विरोध करायचा असा ठराव करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.