Maval : आयआरबीच्या 450 कामगारांची 10 वर्षांची चिंता मिटली – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज –  माजी कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांतून पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील आयडियल रोड बिल्डर्स (आयआरबी) च्या एकूण 450 कामगारांच्या नोकरी, सेवा शर्ती व पगारवाढीचा करार करण्यात आला. शनिवारी (दि.२९) रात्री उशीरापर्यंत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या करारामुळे 450 कामगारांची 10 वर्षांची चिंता मिटल्याचा दावा भेगडे यांनी केला आहे. 

या बैठकीला मेंटेनन्स, पेट्रोलिंग, टनेल, गार्डन, टोल सिक्युरिटी तसेच डेल्टा फोर्स व पुणे जिल्हा मजदूर संघातर्फे (संलग्न भारतीय मजदूर संघ) बाळासाहेब भुजबळ, श्रीकृष्ण वाळुंज, विजेंद्र सावंत, उल्हास मांडेकर, सतीश वाळुंजकर, नीलेश बोडके, शिवाजी पडवळ व इतर कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.  आयआरबी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने एम. आर. एम डायरेक्टर अजय देशमुख, जयवंत डांगरे व कर्नल जोशुआ उपस्थित होते.
 बाळा भेगडे यांनी केलेल्या या मदतीबद्दल सर्व कामगारांनी त्यांचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.