Maval : बोपखेल मध्ये महायुतीची पदयात्रा

बारणे यांना मताधिक्य मिळवून देण्याचे कार्यकर्त्यांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (बुधवारी) बोपखेल येथे पदयात्रा काढली. पदयात्रेची सुरुवात त्यांनी गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेऊन केली. गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या.

यावेळी नगरसेविका हिराबाई उर्फ नानी घुले, दक्षता समिती सदस्य रवींद्र कोवे, लक्ष्मण घुले, सुरेश घुले, मंगला घुले, प्रतिक्षा घुले, माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, कृष्णा वाळके, माऊली गायकवाड, माऊली वाळके, शिक्षण मंडळ माजी सभापती चेतन घुले आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बारणे यांनी बोपखेल मधील पंचशील बुद्ध विहारास भेट देऊन तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केले. तसेच त्यांनी गावातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देणार असल्याचे आश्वासन यावेळी कार्यकर्त्यांनी दिले.

त्यानंतर बारणे यांनी आकुर्डी गावठाण येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेतल्या. कैलास कुटे यांच्या कार्यालयास भेट दिली. स्थानिक नगरसेवक आणि पदाधिका-यांच्या घरी भेटी दिल्या. महायुतीचा विजय असो चा नारा यावेळी संपूर्ण आकुर्डी गावठाणात घुमला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.