BNR-HDR-TOP-Mobile

Maval: पार्थ पवारांसाठी पैसे वाटप करताना शेकाप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ताब्यात

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – प्रचार तोफा थंडावल्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी पैसे वाटप करताना शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. त्यांच्याकडून 20 हजार रुपये रोकड आणि मतदार यादी जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नवी मुंबईतल्या कामोठ्यातून हा  प्रकार समोर आला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघ येतात. पनवेलमधील कामोठ्यात शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप केल जात होते. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची भिस्त शेकापवर अवलंबून आहे. याच मतदारसंघात हे दोन्ही पक्ष पैसे वाटप करत असताना शिवसेनेने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

  • मतदार 400 रुपये वाटप करताना शिवसेना कार्यकर्त्यांनी शेकाप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून 20 हजार रुपये रोकड आणि मतदार यादी जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
HB_POST_END_FTR-A2

.