Maval: कामशेत उड्डाणपूलाचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा -आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कामशेत येथे सुरू असलेले उड्डाणपुलाचे गेल्या वर्षभरापासून रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, असे आदेश मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराला दिले.

कामशेत उड्डाणपुलाचे काम रखडल्याने त्या ठिकाणी वाहतूककोंडी तसेच अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामध्ये निष्पाप नागरिकांना प्राण देखील गमवावे लागले. हा अतिसंवेदनशील व जिव्हाळ्याचा प्रश्न लक्षात घेऊन सुनील शेळके यांनी निवडणूक प्रचारात मतदारांना आश्वासन दिले होते.

त्यानुसार आमदार शेळके यांनी कामशेत उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी कामशेतचे माजी सरपंच तानाजी दाभाडे, राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी गणेश राणे, अतुल मराठे आदी उपस्थित होते.

प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करून उड्डाणपूल वाहतुकीस खुला करून द्यावा, असे आदेश आमदार शेळके यांनी संबंधित शासकीय अधिकारी तसेच कंत्राटदार निर्माण कंस्ट्रक्शनचे प्रकल्प समन्वयक प्रवीण तायडे यांना दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like