Maval: ‘लीडरशिप, टीम बिल्डिंग, परीक्षेपूर्व तयारी’ विषयावरील कार्यशाळा उत्साहात

एमपीसी न्यूज – लीला पूनावाला फाउंडेशनच्या वतीने मावळ तालुक्यातील करंजगाव येथील माध्यमिक विद्यालयात नुकतीच ‘लीडरशिप, टीम बिल्डिंग आणि परीक्षेपूर्व तयारी’ कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये लीडरशिप विषयीचे महत्व सांगितले.

बारावी बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी? टीम बिल्डिंग आणि लीडरशिप तुम्ही शालेय शिक्षण घेत असताना, अभ्यास करत असताना, खेळ खेळताना, अ‍ॅक्टिव्हिटी करताना कशा प्रकारे अमंलात आणू शकता आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहचू शकता हे या कार्यशाळेतून विविध अ‍ॅक्टिव्हिटी, प्रेरणादायी व्हिडिओ आणि लीला सिनिअर्स बरोबर झालेल्या चर्चामधून दाखवण्यात आले.

”जर तुमच्या कृतीमुळे इतरांना शिकण्याची, जगण्याची, नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळत असेल. तर, तुम्ही खरे लीडर आहात असे” कार्यशाळेच्या ट्रेनर रिता शेटीया म्हणाल्या.

बारावी परीक्षेची तयारी कशी करायची? कोणत्या ट्रिक्स वापरायच्या? परीक्षेच्या काळात कमी वेळेत अभ्यास कसा करायचा? वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे? याविषयी सविस्तर कार्यशाळा घेण्यात आली. सर्व लीला सिनिअर्सला प्रशिक्षण झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात आले.

या प्रक्षिशणामुळे आम्हाला लीडरशिप आणि टीम बिल्डिंगचा वापर करता येऊ शकतो. याविषयीचे ज्ञान मिळाले, असे पल्लवी म्हणाली. तर, बारावीच्या परीक्षेची तयारी कशी करावी आणि कमी वेळेत आणि विविध मुद्यांच्या सहाय्याने उत्तरे कशी लिहायची? या विषयी माहिती मिळाल्याचे पूजाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.