Maval: यश असवलेचा खून पूर्ववैमनस्यातून! पोलिसांनी अवघ्या पाच तासांत केले सात आरोपींना गजाआड

Maval: Yash Aswale's murder out of prejudice! Police nabbed seven accused in just five hours

0

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील टाकवे येथे काल रात्री झालेल्या यश असवले या तरुण उद्योजकाच्या खुनाचा छडा वडगाव मावळ पोलिसांनी अवघ्या पाच तासांत लावला आहे. या प्रकरणातील सात आरोपींना पोलिसांनी वडगाव येथील डेक्कन हिल्सजवळ पाण्याच्या टाकी परिसरातून अटक केली. पूर्ववैमनस्यातून यशचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली, अशी माहिती वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली. 

हृतिक बाळू आसवले (वय 20, रा. टाकवे बुद्रुक ता.मावळ), अजय बबन जाधव (वय 24 वर्षे रा. टाकवे),  अतिश राजू लंके (वय 21, रा. वतननगर तळेगाव दाभाडे) विकास उर्फ बापू विष्णू रिठे (वय 23, रा. गुरूदत्त कॉलनी, वराळे रोड, तळेगाव दाभाडे, ५) हृतिक कांताराम चव्हाण (वय 19, रा. म्हाळसकरवाडा, वडगाव मावळ) अश्विन कैलास चोरगे (वय 22, रा. घोणशेत ता.मावळ व निखील भाऊ काजळे (वय 20, रा. म्हाळसकरवाडा, वडगाव मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकवे बुद्रुक गावात टाकवे ते घोणशेत रोडवर टाकवे गावापासून एक कि.मी.अंतरावर टाकवे गावातील यश रोहीदास आसवले (वय 22), महेंद्र अरुण आसवले (वय 35) व निखील सोपान भांगरे (वय 30)  हे तिघे काल (शुक्रवारी) रात्री सव्वादहाच्या सुमारास फिरायला गेले होते.

त्यावेळी त्यांच्या पाठीमागून टाकवे बाजूने 3 मोटारसायकलवरून 7-8 अनोळखी व्यक्ती बेकायदेशीरपणे जमावाने आले. त्यातील चौघांनी गाडीवरून उतरून कोणत्यातरी धारदार हत्याराने यश रोहीदास आसवले याचे डोक्यात वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

महेंद्र अरूण आसवले यांनी दिलेले फिर्यादीवरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेण्यासाठी वडगाव पोलीस स्टेशनची दोन पथके व पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक अशी तीन पथके तात्काळ रवाना केली.

सदर पथकांनी एकत्रितरित्या सदर गुन्हयातील संशयीत आरोपींची माहीती काढली. ते वडगाव मावळ डेक्कन हिल्सजवळ पाण्याचे टाकीजवळ लपून बसलेबाबत माहीती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सर्व आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्हा केलेचे कबूल केले. आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील  व सहायक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुन्हा दखल झाल्यापासून अवघ्या पाच तासांत शिताफीने पकडून सर्व गुन्हेगारांना जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ताटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप देसाई, महिला पोलीस उपनिरीक्षक शीला खोत, सहायक फौजदार विश्वास आंबेकर, कविराज पाटोळे, भाऊसाहेब कर्डिले, पोलीस नाईक गणेश तावरे, मनोज कदम,  श्रीशैल कंटोळी, रवींद्र राय, दिलीप सुपे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गायकवाड, प्रवीण विरणक तसेच एलसीबीचे सहायक फौजदार पाटील, पोलीस हवालदार वाघमारे, पोलीस नाईक महाडिक हे पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like