Maval : पत्नीच्या परस्पर बँकेच्या लॉकरमधून 16 लाखांचे दागिने, भांडी काढली; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीच्या परस्पर बँकेच्या (Maval) लॉकरमधून 16 लाख 10 हजारांचे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी काढले. त्याचा अपहार करून पत्नीला मारहाण करत तिच्या सॅलरी अकाउंटमधून पतीने पैसे काढले. याप्रकरणी पतीसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 जून 2022 रोजी वाकड येथे घडला.

विशाल सुधाकर पाटील (वय 46, रा. वाकड), सुधाकर पंडितराव पाटील (वय 74, रा. गोरेगाव मुंबई) आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Ghodegaon : तहसील कार्यालयाच्या आवारातून ट्रॅक्टर चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती विशाल यांनी फिर्यादी यांच्या परस्पर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले 16 लाख 10 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी काढून घेऊन त्याचा अपहार केला. विवाहितेला हाताने मारहाण करून शारीरिक दुखापत केली. शिवीगाळ करून विवाहितेला घरातून बाहेर हाकलून दिले. घरात येण्यास मज्जाव केला. आरोपींनी लग्न झाल्यापासून माहेरहून पैसे आन म्हणून विवाहितेला वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विवाहितेच्या (Maval) सॅलरी अकाउंटचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड घेऊन विवाहितेचा पगार परस्पर काढून घेतला. विवाहितेला शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. विवाहितेच्या मुलांनाही मारहाण केली. विवाहितेच्या गुगल पे द्वारे पतीने त्याच्या गुगल पेवर पैसे ट्रान्सफर करून घेतले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.