Max Life Insurance : हर्षल आल्पे यांना मॅक्स लाईफ इन्शुरन्स तर्फे सेवा रत्न पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – तळेगावमधील रहिवासी असलेले कलाकार, लेखक तसेच दिग्दर्शक हर्षल विनोद आल्पे यांना यंदाचा मॅक्स लाईफ इन्शुरन्स (Max Life Insurance) पुणे 11 तर्फे दिला जाणारा कलेतील सेवेसाठी सेवा रत्न पुरस्कार मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे उपाध्यक्ष श्रीयुत अमेय मोहिते यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

यावेळी अधिक उत्तमोत्तम कलाकृती हातून घडवण्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी असल्याचे मत हर्षल आल्पे यांनी या प्रसंगी व्यक्त केले. तसेच समाजासाठी निरपेक्ष भावनेने काम करण्याची पोचपावती तसेच या पुरस्कारातून इतरांना ही प्रेरणा मिळावी ही अपेक्षा मोहिते यांनी व्यक्त केली.

MPC News Podcast 1 October 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

या पुरस्काराबरोबरीने कोविडच्या महामारीत शर्थीने कोरोना योद्धा म्हणून सक्षमपणे जीवाची पर्वा न करणारे समाज सेवक तसेच व्हॉइस ओव्हर कलाकार संजय हिरवे यांनाही समाज सेवेसाठी समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. फाईन आर्ट्स कलाकार महेंद्र काकडे यांना चित्रकलेसाठी तसेच उद्योग (Max Life Insurance) क्षेत्रासाठी साने इडली सेंटरचे प्रमुख आमोद साने यांना या प्रसंगी सेवा रत्न पुरस्कार देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.