Mayor Appeal: पुणेकरांनो ‘तो’ व्हिडिओ मॉक ड्रिलचा, अफवांवर विश्वास ठेवू नका; महापौरांचे आवाहन

Mayor Appeal: Punekars, don't believe the rumors of, the video is of mock drill; Mayor murlidhar mohol's appeal या व्हिडिओचा वापर करुन वेगळ्या अर्थाने समाजमाध्यमांमध्ये पसरवला जात आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

एमपीसी न्यूज- पुण्यातील रस्त्यांवर कोरोनाचे रुग्ण सार्वजानिक ठिकाणी सापडण्यास सुरवात झाली असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या मेसेजसोबत त्या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. परंतु, ते मॉक ड्रिल होते. तो कोरोनाचा खरा रुग्ण नव्हता. यंत्रणी किती सतर्क आहे, हे तपासण्यासाठी ती चाचणी करण्यात आली होती, असे स्पष्टीकरण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही महापौर मोहोळ यांनी केले आहे.

पुण्यातील डेक्कन परिसरात मंगळवारी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल करण्यात आले होते. सर्व यंत्रणांची सतर्कता तपासण्यासाठी हे मॉक ड्रिल करण्यात येत असते. मात्र या व्हिडिओचा वापर करुन वेगळ्या अर्थाने समाजमाध्यमांमध्ये पसरवला जात आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या व्हिडिओत एक नागरिक रस्त्याच्या मध्यभागी तडफडत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर काही क्षणात एक ऍम्ब्यूलन्स तिथे येते आणि त्या रुग्णाला त्वरीत नेले जाते. त्याचबरोबर तो जिथे होता, त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आल्याचे व्हिडिओत दिसते.


परंतु, सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकून नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार घडत आहे. पुण्यातील रस्त्यांवर कोरोनाचे रुग्ण सार्वजानिक ठिकाणी सापडण्यास सुरवात झाली आहे. भयानक परिस्थिती आहे. सर्वांनीच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असा मेसेज त्या व्हिडिओसोबत फिरत आहे.

त्यामुळे अखेर महापौर मोहोळ यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करावे लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.