Mpc News Impact : कातवी उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यांची नगराध्यक्ष ढोरे यांच्या स्वखर्चातून डागडुजी

एमपीसी न्यूज – कातवी उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यांची दुरावस्था झाली होती. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले होते. याबाबत ‘एमपीसी न्यूज’ने मंगळवारी (दि.16) वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि स्थानिक युवक कार्यकर्ते दत्तात्रय पिंपळे यांनी या सेवा रस्त्यांची स्वखर्चाने तात्काळ डागडुजी केली.

वडगाव – नवलाख उंब्रे एमआयडीसी रस्त्यावरील कातवी पुलाखालील दोन्ही सेवा रस्त्यांची दुरावस्था झाली होती. या रस्त्याने प्रवास करणारे वाहन चालक खड्ड्यांमुळे त्रस्त झाले होते. वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत असे. गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता.

या ठिकाणी नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस व माजी सरपंच विशाल वहिले यांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. तसेच याबाबत एमपीसी न्यूजने वृत्त प्रकाशित केले होते. याची तात्काळ दखल घेऊन एक दिवसात वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी मुरूम उपलब्ध करून दिला व स्थानिक युवक कार्यकर्ते दत्तात्रय पिंपळे यांनी जेसीबीच्या साह्याने सर्व खड्डे बुजवून तात्पुरत्या स्वरूपात खड्ड्यांची डागडुजी केली.

हे काम एमआयडीसी हद्दीत असल्याने या कामाची एमआयडीसीने जबाबदारी घ्यावी. या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.