Pimple gurav News: स्मार्ट सिटी अंतर्गत “8 टू 80 पार्क”चे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या निमित्त पिंपळे गुरव येथील सुदर्शन चौक या ठिकाणी मनोहर पर्रीकर समतल विलगक मार्ग जवळील उपलब्ध जागेमध्ये ‘8 ते 80 उद्यान ‘( 8 to 80 Park )’ (8 वर्षांपासून 80 वर्षापर्यंत वयोगटातील व्यक्तींसाठी ) विकसित करण्याच्या कामाचा भुमीपूजन समारंभ  महापौर उषा  ढोरे यांचे हस्ते पार पडला.

‘ड’ प्रभाग अध्यक्ष सागर अंघोळकर, नगरसेवक शशिकांत कदम, नगरसेविका उषाताई मुंडे, नगरसेविका चंदाताई लोखंडे, स्विकृत नगरसदस्य महेश जगताप, तसेच पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. चे महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता, मनोज सेठिया, उप अभियंता  ( विद्युत ) महेश कावळे,  उपअभियंता ( स्थापत्य ) चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता राहुल पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

हे काम बी. जी. शिर्के कंपनी मार्फत सुरू आहे. त्याकरीता सल्लागार म्हणून प्रसन्न देसाई आर्किटेक्ट हे काम पाहत आहेत. उद्यानामध्ये लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरीकांपर्यंत सर्वांना उपयुक्त असणाऱ्या बाबींचा समावेश करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये लहान मुलांकरीता स्केटींग बोर्ड झोन, खेळाचे साहित्य, जंगल जिम, मेरीगो राऊंड, सिसॉ, बदक, साप शिडी, गेम झोन, इत्यादी व जेष्ठ नागरीकांसाठी बैठक व्यवस्था तसेच अँफीथेटर, पादचारी मार्ग, क्लॉक टॉवर, व्हिविंग टॉवर व उपलब्ध जागेमध्ये बगिचा विकसित करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प महाव्यवस्थापक अशोक भालकर यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.