Chinchwad News : चंदुकाका सराफ यांच्या ‘वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशन’चे महापौरांच्या हस्ते उद्धाटन

एमपीसी न्यूज – शहरातील अग्रगण्य सूवर्णपेढी चंदुकाका सराफ अँन्ड सन्स ‘वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशन’ ही संकल्पना राबवित आहेत. सूवर्णपेढीच्या लिंक रोड, चिंचवड येथील शाखेत या संकल्पनेचे पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते रविवारी (दि.05) उद्धाटन झाले. चोखंदळ ग्राहकांना सर्व दागिन्यांचे वन स्टॉप सोल्युशन मिळावे या हेतून ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.

यावेळी चंदुकाका सराफ अँन्ड सन्सचे किशोर कुमार जिनदत्त शहा, संगीता शहा, अंकिता शहा, अतुल शहा, आदित्य शहा, सम्यक शहा, महाराष्ट्र राज्य व्यावसायिक महिला संघटना अध्यक्ष आणि आकांक्षा संस्थेच्या संस्थापिका तृप्ती रामाने, एमपीसी न्यूजचे अनुप घुंगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

महापौरांनी चंदुकाका सराफ यांच्या हटके संकल्पनेचे कौतुक करत दालनाची पाहणी केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

‘वेडिंग ज्वेलरी डेस्टीनेशनमध्ये’ ग्राहकांना नववधुच्या शृंगारासाठी सोने आणि हिऱ्याचे आकर्षक दागिने मिळतील. तसेच, लग्नसोहळ्याकरिता लागणाऱ्या संपूर्ण लग्नघराची तयारी एकाच ठिकाणी करता येईल. सध्या लग्न सराईचे दिवस सुरू झाले आहेत, अशात सूवर्ण खरेदीसाठी एकाच ठिकाणी आकर्षक आणि विश्वासहार्य दागिने खरेदी करता येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.