Pimpri : पालिकेच्या मिळकतीला महिन्याभरात ‘कंपाऊंड’ करा; अन्यथा कारवाई; महापौरांचा इशारा 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात अनेक मिळकती आहेत. परंतु, त्याला ‘कंपाऊंड’ केले  गेले नाही. त्यामुळे त्याचा गैरवापर करुन पैसे कमविले जातात. त्यासाठी येत्या महिन्याभराच्या आतमध्ये स्थापत्य विभागाने पालिकेच्या ताब्यात आलेल्या सर्व मिळकतींना ‘कंपाऊंड’ करावे, असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी दिले आहेत. तसेच महिन्याभरात कारवाई न केल्यास अधिका-यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील महापौरांनी दिला आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेने आरक्षणाच्या विविध जागा ताब्यात घेतल्या आहेत. त्याच्या मोबदल्यात जागा मालकाला टीडीआर, एफएसआय दिला आहे. तथापि, पालिकेच्या ताब्यात असलेल्या जागांचा गैरवापर केला जात आहे. त्याच्या माध्यमातून पैसे कमविले जातात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

त्या पार्श्वभूमीवर महापौर राहुल जाधव यांनी पालिकेच्या ताब्यात असलेल्या सर्व जागेवर ‘वॉल कंपाउंड’ करावे.  महिन्याभराच्या आतमध्ये कंपाऊंड करावे. त्या ठिकाणी महापालिकेची मालकी असलेला मजकूर लिहिलेला फलक लावण्यात यावा. ही कार्यवाही तातडीने करण्यात यावी. अन्यथा संबंधित अधिका-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापौर जाधव यांनी दिला आहे.

यावेळी शहर अभियंता अंबादास चव्हाण व नगररचना विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.