Pune : महापौर पद खुल्या गटासाठी; मोहोळ, भिमाले, घाटे, शिळीमकर, मेंगडे, तापकीर, नागपुरे, एकबोटे, पोटे यांचे नाव आघाडीवर

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे महापौर पद खुल्या गटासाठी आरक्षित असल्याची घोषणा आज मुंबईत करण्यात आली. त्यामुळे महापौर पद खासदार गिरीश बापट गट, संजय नाना काकडे गट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गट की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटाला मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.

महापौर पदासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर आहेत. महापौर मुक्ता टिळक यांचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आरपीआय (आठवले गट) ला 5 वर्षांसाठी उपमहापौर पद हवे असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या राज्यात आरपीआय भाजप सोबत असल्याने महापालिकेत पुढील अडीच वर्षेही उपमहापौर पद देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. नगरसेविका मंजुषा नागपुरे, ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, वर्षा तापकीर, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, धीरज घाटे, राजाभाऊ लायगुडे, हेमंत रासणे, दिलीप वेडे पाटील, सुशील मेंगडे, दीपक पोटे, प्रसन्न जगताप यांच्याही नावाची महापौर पदासाठी चर्चेत आहेत.

महापौर पद खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने भाजपच्या सर्वच नगरसेवकांना या पदाचे स्वप्न पडायला लागले आहेत. महापालिकेत भाजपचे 99 नगरसेवक आहेत. अडीच वर्षे महिलेला संधी दिल्याने यावेळी पुरुष नगरसेवकाला महापौर पद देण्यात येणार असल्याचे समजते.

यावेळी इतर नगरसेवकांनाही पदे देण्याची मागणी करण्यात येत आहे. कोथरूड मतदारसंघात आमदारकीसाठी मुरलीधर मोहोळ प्रबळ दावेदार होते. त्या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मोहोळ यांना योग्य ते पद देण्यात येणार असल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले होते. त्यामुळे त्यांचे नाव महापौर पदासाठी आघाडीवर आहे. तर, पर्वती मतदारसंघात सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचे नाव आघाडीवर होते. पण, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे भिमाले यांचाही महापौर पदासाठी विचार केला जाऊ शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like